पिंपरी चिंचवड शहरांमध्ये सुरू झालेली पिंक रिक्षा राज्यभर घेऊन जाण्याच्या निर्णयाचे स्वागत

bpcauthor bpcauthor
1 Min Read

दि १ जुलै (पीसीबी ) – पिंपरी चिंचवड शहरातील कागद काच पत्रा वेचक, धुणी -भांडे साफसफाई अधि कष्टाची कामे करणाऱ्या शंभर महिलांना रिक्षाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे लायसन बॅच बिल्ला काढून त्यांना परमिट मिळवून देण्याचा उपक्रम कष्टकरी कामगार पंचायत व घरकाम महिला सभा या संघटनेच्या वतीने राबवण्यात आला,

सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ व माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने, पिंपरी चिंचवड येथे,शंभर महिलांना रिक्षाचे वितरण करण्यात आले,

या कामी शासनाची कोणती मदत मिळाली नाही परंतु महिलांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम आम्ही यशस्वी केला,

आता या उपक्रमाची दखल महाराष्ट्र बरोबर देशभर घेतली जात असून महाराष्ट्र सरकारने दहा हजार पिंक रिक्षा देण्याचा निर्णय जाहीर केला असून या निर्णयाचा आम्ही स्वागत करत असून,

या निर्णयाची यशस्वी अंमलबजावणी व्हावी अशी मागणी देखील करत आहोत असे याप्रसंगी घरकाम महिला सभा अध्यक्ष अशा कांबळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे म्हणाले

Share This Article