शिवसेनेचे नेते अनिल परबांची मोठी आघाडी

0
125

दि १ जुलै (पीसीबी )मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात ठाकरे गट आघाडीवर आहे. मुंबई पदवीधर निवडणुकीत ठाकरे गटाकडून अनिल परब हे तब्बल २० हजार मतांनी आघाडीवर आहेत तर भाजपचे किरण शेलार हे पिछाडीवर आहेत. मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज.मो. अभ्यंकर ६१ मतांनी आघाडीवर आहेत. तर चार पैकी दोन फेऱ्यांमध्ये ठाकरे गटाचे अनिल परब हे जाहीर मतांचा कोटा गाठण्याच्या दिशेने आहेत. ५ हजार ८०० मतांचा कोटा ठरवण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई पदवीधर मतदार संघात ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात लढत आहे तर कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसच्या रमेश किर यांच्यात चुरशीची लढत आहे. तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ज.मो. अभ्यंकर हे निवडणूक रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचा फैसला लवकरच समोर येणार असल्याने उत्सुकता कायम आहे.
मुंबई शहरात शिवसेनेचेच वर्चस्व कायम राहणार असल्याचे निकालातून दिसते. भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांना टार्गेट केले होते. आता पुन्हा आमदारकी मिळत असल्याने सोमय्या यांना चाप बसला आहे.