बीडच्या गोळीबार प्रकरणाला राजकीय अँगल

0
104

बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. बीडमध्ये गोळीबारात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. गोळीबाराच्या या घटनेनं बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आता या घटनेचा राजकीय अँगलही समोर आला आहे. मयत सरपंच हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे असल्याचं समोर आलं आहे. तर गोळीबारातील मुख्य आरोपी शरद पवार गटाचे नेते आहेत. या घटनेनंतर परळीत तगडा पोलीस बंदोबस्त आहे.

बीडच्या परळी शहरातील गोळीबाराच्या घटनेत गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांचे आरोपींमध्ये नाव आहे. त्यामुळे, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बीडच्या परळी शहरत रात्री झालेल्या गोळीबारात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची हत्या करण्यात आली. तर ग्यानबा गित्ते गंभीर जखमी आहेत. शहारातील बँक कॉलनीत परिसरातील या घटनेनं परळी शहरात तणावाचं वातावरण आहे.

या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या ग्यानबा गीते यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. आरोपीमध्ये शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांचं नाव आल्यानं राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. याशिवाय अन्य चार जणांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींमध्ये शशिकांत पांडुरंग गीते उर्फ बबन गीते, मुकुंद ज्ञानेश्वर गीते, महादेव उध्दव गीते, राजभाऊ संजीवन नेहरकर, राजेश अशोक वाघमोडे यांची नावं आहेत. गंभीर जखमींवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री बीडचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट दिली. दरम्यान हा गोळीबार नेमका कशामुळे झाला याचां तपास पोलीस करतं आहेत.. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान मयत बापू आंधळे हे मंत्री धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत.