इंद्रायणी नदीवर झालेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढा – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मागणी

0
170

संत ज्ञानेश्वर महाराज, आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या येत्या काही दिवसात देहू आणि आळंदीवरून मार्गस्थ होतील. पण इंद्रायणी नदीची अवस्था अशी आहे की त्या नदीच्या पाण्याला कोणीही स्पर्श करू शकत नाही किंवा त्याचे पाणी प्राशन करू शकत नाही. इंद्रायणी नदीची फेसाळलेली अवस्था गेली कित्येक वर्ष आपण पाहात आहोत.

दरवर्षी करोडो रुपये खर्च करूनसुद्धा इंद्रायणी स्वच्छ का होत नाही? याचाच जाब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पदाधिकाऱ्यांनी विचारला.

पक्षाचे कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे,वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप जगताप आणि मुख्य प्रवक्ते माधव पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त खोराटे यांना याबद्दलचे निवेदन दिले. तायडे असे म्हणतात की

इंद्रायणी नदीवर झालेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढावी आणि ती माहिती समस्त पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना द्यावी. तसेच वारकऱ्यांच्या स्नानाची योग्य व्यवस्था करावी. यावेळी के.डी.वाघमारे, रोहित जाधव आदी उपस्तिथ होते.