धनिकपुत्राला वाचविण्यासाठी दुसरे षडयंत्र – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप

0
103

पुणे: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका अल्पवयीन धनिकपुत्राने पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर येरवाडा पोलीस आणि ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी उद्योगपती विशाल अग्रवाल यांच्या मुलाला वाचवण्यासाठी गंभीर आणि अक्षम्य लपवालपवी, फेरफार केले होते. या सगळ्याविरोधात जनतेने प्रचंड रोष व्यक्त केला होता. त्यानंतर आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर एक गंभीर आरोप केला आहे. या अपघातप्रकरणात विशाल अग्रवाल यांच्या मुलाला वाचवण्यासाठी आणखी एक षडयंत्र रचण्यात आल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

अनिल देशमुख यांनी गुरुवारी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये अनिल देशमुख यांनी म्हटले आहे की, पुणे हिट ॲन्ड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारु न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले,हे उघड झाले आहे. आता माजी गृहमंत्री म्हणुन माझी माहिती अशी आहे की, मृतकांच्या Viscera Report मध्ये Alcohol +ve यावे याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे. जेणेकरुन या प्रकरणामध्ये मृत झालेले मोटरसायकल वरील तरुण-तरुणी हे दारु पिऊन होते आणि त्यांच्यामुळेच हा अपघात झाला, असे न्यायालयात सिद्ध करता येईल. जेणेकरून विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल, अशा पध्दतीने प्रयत्न सध्या सरु आहेत, असा धक्कादायक आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. या सगळ्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काही बोलणार का, हे पाहावे लागेल.

कल्याणीनगर परिसरातील या अपघातामध्ये अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. हे दोघेजण बाईकवरुन जात असताना विशाल अग्रवाल यांच्या मुलाच्या भरधाव वेगातील पोर्श कारने त्यांना धडक दिली होती. यामध्ये अनिस आणि अश्विनी या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर विशाल अग्रवाल यांच्या मुलाला येरवाडा पोलिसांनी दिलेली रॉयल ट्रिटमेंट आणि ससून रुग्णालयात धनिकपुत्राची अल्कोहोल टेस्ट पॉझिटिव्ह येऊ नये म्हणून ब्लड सॅम्पलची झालेली अदलाबदल जगासमोर आली होती. या सगळ्यामुळे पोलीस यंत्रणा आणि ससून रुग्णालायची प्रचंड नाचक्की झाली होती. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण अग्रवाल कुटुंबीय पोलीस कोठडीत आहे. तर अल्पवयीन मुलगा हा बालसुधारगृहात आहे.

पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात मोठी अपडेट
विशाल अग्रवाल यांच्या मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. बाल न्याय मंडळाच्या आवारात झाली पैशांची देवाणघेवाण. रक्ताचे नमुने बदलल्यानंतर पैशांचा व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयातील शिपाई अतुल घटकांबळे याच्याकडे ३ लाख रुपये देण्यात आले होते. विशाल अगरवाल याच्या घरातून आलेले पैसे आधी मकानदार आणि त्यानंतर घटकांबळेकडे देण्यात आले. 50 हजार रुपये हे घटकांबळेसाठी तर 2.5 लाख रुपये डॉ श्रीहरी हळनोर यांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे