शेअर आणि आयपीओ खरेदी करून त्यातून मोठ्या प्रमाणात नफा मिळेल, असा विश्वास संपादन करून एका व्यक्तीकडून 45 लाख 97 हजार 940 रुपये घेत फसवणूक केली. हा प्रकार 24 मार्च ते 13 मे या कालावधीत पुनावळे येथे घडला.
याप्रकरणी 30 वर्षीय व्यक्तीने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार काशिका पटियाल या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादीस व्हाटसअप ग्रुप मध्ये जॉईन करून घेतले. त्यांना शेअर्स आणि आयपीओ खरेदी-विक्रीतून जास्त नफा मिळेल असे आमिष दाखवले. शेअर्स खरेदी करण्यासाठी फिर्यादीस एचएफटी हे एप डाउनलोड करण्यास सांगितले. फिर्यादीकडून शेअर्स खरेदी करण्यासाठी वेळोवेळी 45 लाख 97 हजार 940 रुपये घेतले. त्यांना नफा झाल्याचा खोटा इलेक्ट्रोनिक अभिलेख आरोपीने तयार करून एपच्या माध्यमातून फिर्यादीस दाखवला. फिर्यादीने त्यावरील पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पैसे मिळाले नाहीत त्यामुळे त्यांनी आरोपीकडे पैशांची मागणी केली. मात्र आरोपीने पैसे न पाठवता त्या एप मधील फिर्यादीच्या सर्व परमिशन काढून घेत त्यांची फसवणूक केली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.