असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी देण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

0
86

असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी देण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर 2022 या कालावधीत मेदनकरवाडी येथे घडला.

याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नवनाथ उद्धव शिंदे (वय 40, रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवनाथ हा फिर्यादी महिलेच्या घरी आला. त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना असिस्टंट मॅनेजर पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखवले. त्यातून महिलेकडून 40 हजार रुपये घेतले. त्यानंतर महिलेला नोकरी न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.