शेतकऱ्यास मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल

0
194

शेतात काम करत असलेल्या दांपत्यास सहा जणांनी मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. ४) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील गोळेगाव येथे घडली.

वैभव दिगंबर चौधरी, योगेश दिगंबर चौधरी, तेजस दिगंबर चौधरी, कैलास रघुनाथ चौधरी, करण कैलास चौधरी, कुणाल कैलास चौधरी (सर्व रा. दत्त मंदिरासमोर, गोलेगाव, ता. खेड, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सरिता प्रताप चौधरी (वय 32) यांनी मंगळवारी (दि. 4) याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी सरिता आणि त्यांचे पती प्रताप चौधरी असे दोघेजण शेतात काम करीत होते. त्यावेळी तीन दुचाकीवरून आलेल्या सहा आरोपींनी फिर्यादी यांच्‍या पती प्रताप यांच्याकडे तुमच्या जागेतून जाण्या-येण्यासाठी रस्ता द्या, असे म्हणाले. त्यावेळी त्यांचे पती यांनी तुम्ही केलेले अतिक्रमण पहिले काढून द्या, असे म्हणाले. या कारणावरून चिडलेल्या आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी वैभव चौधरी यांनी हातातील लोखंडी गजाने फिर्यादी यांच्या पतीच्या डोक्यात मारहाण केली. फिर्यादीचे पती चौधरी हे खाली पडले असता आरोपी योगेश यांनी कोयता व इतर आरोपींनी हाताने व लाथा बुक्क्याने फिर्यादी यांच्या पतीस मारहाण करून जखमी केले. फिर्यादी यांना सुद्धा आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करीत ‘तुला दगडाने ठेचून मारेल’, अशी धमकी दिली.