पंकजा मुंडेंच्या पराभवामुळे सहा आमदारांवर टांगती तलवार

0
243

मराठा आंदोलनामुळे हिंसेची धग बसलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवला. बीड लोकसभेची लढत अतिशय रोमहर्षक झाली. प्रत्येक फेरीनंतर अन् प्रत्येक तासाला चित्र बदल होते. बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा विजय होईल, असा अनेकांचा अंदाज होता. त्याला कारणेही तशीच होती. पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी आमदारांचा फौजफाटा होता. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजप आणि राष्ट्रवादीचे आमदार असतानाही पंकजाला आघाडी घेता आली नाही. परळीचा अपवाद वगळता पंकजा मुंडे यांना कुठेही मोठी आघाडी घेता आली नाही.

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या मागे सहा आमदारांचा फौजफाटा होता. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेसाठी जिवाचं रान केले होते, त्यामुळे भाजपला हा विजय सहज मिळेल असं म्हटले जात होते. पण सहा आमदार पाठिशी असतानाही पंकजा मुंडे यांच्या पदरी निराशाच झाली. लोकसभेतील पराभवानंतर भाजप अलर्ट मोडवर गेलेय. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर सहा आमदार अलर्ट मोडवर गेल्याची चर्चा आहे.

बीड लोकसभेत कोण कोणते आमदार पंकजा मुंडेंच्या पाठिशी –
गेवराई – भाजप – लक्ष्मण पवार

माजलगाव – राष्ट्रवादी (अजित पवार)- प्रकाशदादा सोळुंके

आष्टी – राष्ट्रवादी (अजित पवार)- बाळासाहेब अजबे

केज – भाजप – नमिता मुंदडा

परळी – राष्ट्रवादी (अजित पवार)- धनंजय मुंडे

सुरेश धस – विधानपरिषद आमदार

खासदार कोण कोणते ?

प्रीतम मुंडे – बीड लोकसभा खासदार

भागवत कराड – राज्यसभा खासदार

पंकजा मुंडे यांचं पुढे काय ?
प्रतीम मुंडे यांना नाकारुन भाजपने पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरवले होते. उमेदवारी मिळाल्यानंतर प्रीतम मुंडे यांना विस्थापित होऊ देणार नाही, असा शब्द पंकजा मुंडे यांनी दिला होता. पण आता पराभव झाल्यामुळे पंकजा मुंडे याच विस्थापित झाल्याच्या चर्चा सुरु आहे. पंकजा मुंडे काय भुमिका घेणार? त्यांचं पुढे काय ? राज्यसभेवर जाणार का ? आमदारकी लढणार का ? यासारखे प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये आहेत.

केज, गेवराई, अष्टीत पंकजा मुंडेंना मोठा धक्का; भाजप आमदारांच्या मतदारसंघातही पिछाडी –
आष्टी, गेवराई, केज, माजलगाव या मतदारसंघात पंकजा मुंडे यांना मोठा फटका बसलाय. भाजपचे आमदार असतानाही पंकजा मुंडे यांना मोठी आघाडी मिळाली नाही. काही मतदारसंघात आघाडी मिळाली, पण ती नाममात्र.. आष्टीमध्ये नेहमीपेक्षा मिळणाऱ्या मताधिक्यामध्ये घट झाली. आष्टीमध्ये गतवेळपेक्षा निम्मी घट झाली. गेवराईमध्येही आघाडी घेता आली नाही. माजलगावमध्ये फक्त 935 मतांची आघाडी मिळाली. ज्या नेत्यांवर भाजपला आघाडी मिळवण्याचा विश्वास होता, त्या मतदारसंघात साफ निराशा झाली. पंकजा मुंडे यांना फक्त परळीमधून मोठी आघाडी मिळाली.