पत्नीला माहेरून घेऊन जाण्यासाठी आलेल्या जावयाला सासऱ्याने बांबूने मारहाण केली आहे. ही घटना 31 मे 2024 रोजी थेरगाव येथे घडली.
याप्रकरणी विनोद सुरेश कदम (वय 26 रा पिंपरी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी सासरे बंडू वाघमारे (वय 50 रा थेरगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पत्नी ही सासरी नांदण्यासाठी येत नव्हती. तिला घेऊन जाण्यासाठी फिर्यादी व त्यांची बहीण हे आरोपीच्या घरी गेले. यावेळी आरोपीने फिर्यादी शी वाद घालत फिर्यादीच्या बहिणीला बांबूने मारहाण केली. फिर्यादी भांडणे सोडवण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांनाही लाकडी बांबूने मारहाण करत जखमी केले.यावरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.