जहाजाचे तिकीट बुक करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाचे 29 हजार रुपयांची फसवणूक

0
113

जहाजाचे तिकीट बुक करून देण्याच्या बहाण्याने एका 59 वर्षे नागरिकाचे 29 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना 5 डिसेंबर 2023 रोजी चिंचवड येथे ऑनलाइन पद्धतीने घडले.

याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात अभिजीत मोहन डोळ (वय 52 रा. चिंचवड) यांनी सोमवारी (दि.3) फिर्यादी दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी 9807030703 मोबाईल क्रमांक धारक शिवराम कृष्णन मरिअप्पन व 9080000101 हा मोबाईल धारक अज्ञात इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मित्र राजू कुमठा (वय 59) यांना ऑनलाइन बनावट वेबसाईट द्वारे आरोपींनी विशाखापट्टणम ते पोर्ट ब्लेअर अंदमान असे समुद्र जहाजाचे तिकीट बुक करून देण्याचा बहाणा करून त्यांच्याकडून 29 हजार 100 रुपये घेतले. मात्र अद्यापही त्यांना कोणतेही तिकीट न देता त्यांचे फसवणूक केली आहे. यावरून चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.