फलोदी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार एनडीएला 350 ते 375 जागा मिळणार

0
174

लोकसभा निवडणुकीचा शेवटचा आणि सातवा टप्प्याचे मतदान 1 जून रोजी पार पडणार आहे. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. संपूर्ण देशाचं लक्ष निकालाकडे लागून आहे. नेमकं कोणाचं सरकार 4 जूनला येणार याची उस्तुकता सर्वांना लागली आहे.

फलोदी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार, भाजप उत्तर प्रदेशात 60 जागा जिंकू शकते. 2019 मध्ये भाजपने 62 तर 2014 मधील लोकसभा निवडणुकीत पक्षाने 71 जागांवर विजय मिळवला होता.

काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशात 20 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 2019 मधील निवडणूक समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टीने संयुक्तपणे लढली होती. पण त्यांना 80 लोकसभा जागांपैकी केवळ 15 जागांवर विजयश्री खेचून आणता आला.

तेलंगाणात भाजपला 11 ते 12 जागा, छत्तीसगडमध्ये 9, उत्तराखंडमध्ये 5, दिल्लीमध्ये 7, हिमाचल प्रदेशमध्ये 4, हरियाणात 4 ते 6, झारखंडमध्ये 10 ते 11 तर आंध्र प्रदेशमध्ये 9-11 जागा जिंकू शकते. महाराष्ट्राविषयी काही भाकीत समोर आलं नाही.

सट्टा बाजारानुसार, एनडीएला 350 ते 375 जागा मिळतील. काँग्रेसला 55 ते 70 जागा मिळतील. पाचव्या टप्प्यातील मतदानानंतरची ही आकडेवारी असल्याचा सांगितलं जातंय.

राजस्थानमध्ये एकूण 25 जागा आहेत. त्यातील 19-20 जागा भाजप सहज जिंकेल. तर इंडिया आघाडी 5 ते 6 जागांवर विजय मिळवेल.