पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – देशातील तमाम नारीशक्तीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श असल्याने संस्कार, संस्कृती आजही कायम आहे, असे मत पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती माजी अध्यक्षा सिमाताई सावळे यांनी व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त पिंपरी महापालिका भवना जवळील अहिल्यादेवी चौकात जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सिमाताई बोलत होत्या. अहिल्यादेवींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्यांनी अभिवादान केले. यावेळी कासारवाडी येथील जेष्ठ माजी नगरसेविका आशाताई शेंडगे-धायगुडे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने परमपूज्य अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंतीचे आयोजन केले होते. शहरातील राजकीय, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.










































