… तर विधानसभेच्या २८८ जागा लढविणार, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

0
131

मराठा समाजासाठी सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही किंवा सरसकट कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना दिलं नाही तर विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची मोठी घोषणा पुण्यातून मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. इतकंच नाहीतर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरून २८८ जागांवर विधानसभा निवडणूक लढणार असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. तर मराठा समाजाकरता सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणीच्या मागणीसाठी येत्या ४ जूनपासून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू करणार असल्याचेही गेल्या काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोर सांगितले होते.

पुण्यात आज मनोज जरांगे पाटील हजर होते. २०१३ साली कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणुकीचा गुन्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना वॉरंट बजावले होते. याप्रकरणात आज ते पुण्यातील कोर्टात हजर झाले होते. त्यांच्याविरोधातील वॉरंट पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाकडून रद्द करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही मोठी घोषणाही केली.