पूर्ववैमनस्यातून तरुणाला बेदम मारहाण

bpcauthor bpcauthor
1 Min Read

दि २९ मे (पीसीबी ) – जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. यामध्ये तरुण जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. 27) रात्री पिंपळे सौदागर येथे घडली.

प्रवीण भारत मस्के (वय 20, रा. पिंपळे गुरव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल कैलास दुणगे (वय 33), प्रलय संजय जगताप (वय 30, दोघे रा. पिंपळे सौदागर) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण मस्के आणि आरोपी यांचे पूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी सोमवारी रात्री प्रवीण यांच्यासोबत विनाकारण वाद घातला. त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रस्त्याच्या बाजूला पडलेला सिमेंटचा गट्टू प्रवीण यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article