जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या…

0
279

नाशिक, दि. २९ (पीसीबी) – नाशिकमध्ये भद्रकाली परिसरात असलेल्या साक्षी गणेश येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्ताने कालीचरण महाराजांच्या व्याख्यानाचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी कालिचरण महाराजांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे आणि ते वक्तव्याच्या आता चांगल्याच चर्चा रंगल्या आहे. टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या… सर्व भोगून घ्या… चांगल्या फुलाचा देखील वास घ्या. नाकाचा देखील सुगंध घ्या. हा सर्व आनंद संपून जाईल. मात्र ईश्वराचा आनंद हा कधीही संपणार नाही, असे कालिचरण महाराज म्हणतात. दरम्यान, आठवी पास असलेला मूळचा अभिजीत धनंजय सराग हा कालिचरण महाराज म्हणून जी बेफाम वादग्रस्त विधाने करत आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे.

कालिचरण महाराज म्हणाले की, सध्याची परिस्थिती अशी दिसत आहे. पूर्वी काय होती आणि आता काय आहे मात्र या परस्थितीची जाणीव परिपूर्ण करून देतो. तसेच माणुसकी आपल्याला धर्म तर शिकवणार आहेच. मात्र ज्यामध्ये धर्म नाही तो ढोर आहे. तसेच खाणे, झोपने, सेक्स करणे, पिणे हे सर्व लक्षण पशूंमध्ये देखील असतात. त्यामुळे भारत हिंदूराष्ट्र झाला पाहिजे का? लव जिहाद आणि लॅन्ड जिहाद संपला पाहिजे का? यावर कठोर कायदा झाला पाहिजे का? असं वक्तव्य कालीचरण महाराजांनी केलं आहे.

याशिवाय महामुनी अगस्त्य ऋषी हे माझे गुरू आहेत. माझ्या रूममध्ये अगस्त ऋषी ब्रम्ह मुहूर्तावरण प्रगट देखील झाले होते. त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या आहेत. तर आज त्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. जर तुम्ही आता सावरले नाहीत तर काय मारणार आहे. पण पिंडदानसाठी कोणीही उरणार नाही. याशिवाय मी वाईट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे असंही कालीचरण महाराज म्हणाले आहेत.

कालिचरण महाराज व्याख्यानादरम्यान म्हणाले कि, अध्यात्म शब्दाचा अर्थ काय आहे? ईश्वराच्या बाबतीत देखील धर्माच्या अनेक व्याख्या रुजल्या आहेत. त्यामुळे आपण देवाकडे जगातील सर्वात श्रेष्ठ गोष्ट मागितली पाहिजे. करोडो वेळा संभोग केल्यावर जो अंनाद मिळतो अगदी त्या पेक्षा जास्त आनंद हा मिळालाच पाहिजे. तसेच टार्गेट पूर्ण करून देणार. टार्गेट म्हणजे धर्म. त्यामुळे जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या… सर्व भोगून घ्या… चांगल्या फुलाचा देखील वास घ्या. नाकाचा देखील सुगंध घ्या. हा सर्व आनंद संपून जाईल. मात्र ईश्वराचा आनंद हा कधीही संपणार नाही”, असं कालीचरण महाराज म्हणाले आहेत.