तडीपार केल्याचा राग मनात धरून आरोपीने एका तरुणावर सिमेंटच्या गट्टू ने मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी (दि.25) चिंचवड येथे घडली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अविनाश सुभाष पात्रे (वय 19 रा. चिंचवड) याला अटक केली आहे. त्याचे साथीदार सुप्रीम काळे (वय 25 रा.चाकण), विनायक क्षीरसागर व सुरेश काटे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सुजल रामदास भिवरकर (वय 19 रा.चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या वडीलामुळे सुप्रीम काळे हा तडीपार झाल्याचा राग मनात धरून त्याने फिर्यदीची कार अडवली. यावेळी फिर्यादी यांनी समजवण्याचा प्रयत्न केला.तरी आरोपीने फिर्यादी च्या डोक्यात सिमेंट क्या गट्टू ने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. हातातील कोयता फिरवून दहशत पसरवली.यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.










































