बालगुन्हेगार ठरवण्यासाठी वयाची अट कमी करावी

0
121

१८ वर्षे पूर्ण नसतील, तर बालगुन्हेगार म्हणून गंभीर गुन्ह्यातूनसुद्धा आरोपींची सुटका होते. यासाठी १८ वर्षांची मर्यादा ने कमी करून १६ वर्षे करावी, आशी मागणी उदय चोंधे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ईमेल द्वारे केली आहे

यामध्ये चोंधे म्हणतात की हल्ली १६ ते १७ वयात मुले परिपक्व होतात. अल्पवयीन मुलांनी बलात्कार, खून यासारखे गंभीर गुन्हे केलेले आपण पाहतो. मुलांनी बलात्कार, खून यासारखे गंभीर गुन्हे केलेले आपण पाहतो. कल्याणीनगरमध्ये बिल्डरच्या मुलाने दोघांचे जीव घेतल्याचे उदाहरण ताजे आहे. अनेक गुन्हेगारी टोळ्या आपल्या टोळ्र्यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश करून त्यांच्याकडून प्रतिस्पर्धी गुंडांचे खून करणे, दहशत माजवणे यासारखे कृत्य करवून घेतात. अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन त्यांना तत्काळ जमीन मिळतो. व ते पुन्हा न घाबरता गुन्हा करतात याची सरकारने गंभीर दखल घेऊन याबाबत कायदा करावा. अशी विनंती उदय चोंधे यांनी केली आहे.