चोरलेल्या गॅसची चढ्या दराने विक्री

0
143

बेकायदेशीर तसेच धोकादायाकपणे मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस चोरून काढत तो लहान सिलेंडरमध्ये भरला. त्यानंतर हे सिलेंडर काळ्या बाजारात चढ्या दराने विकले. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बावधन बुद्रुक येथे सिद्धनाथ गॅस एजन्सीवर कारवाई केली. ही कारवाई बुधवारी (दि. 22) दुपारी करण्यात आली.

दादासाहाबे अर्जुन श्रीनामे (वय 31, रा. बावधन बुद्रुक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रदीप गुट्टे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीनामे याने घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून चार किलो वजनाच्या लहान सिलेंडर मध्ये चोरून गॅस काढला. याबाबत त्याच्याकडे कोणताही परवाना नसताना त्याने धोकादायकपणे हे कृत्य केले. तसेच चोरून काढलेल्या गॅस सिलेंडरची काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री केली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत श्रीनामे याच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच त्याच्या ताब्यातून 72 हजार 500 रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.