बनावट कागदपत्रांच्या आधारे महिलेची फसवणूक

0
113

बनावट कागदपत्रांच्या आधारे महिलेची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३१ मे २०२३ ते २९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत चिंचवड व दुय्यम निबंधक कार्यालय मुळशी व पौड येथे घडला.

संजय चंदनमल जैन, आकाश संजय जैन, करुणेश संजय जैन, गोरख दौलत धनगर, प्रशांत भिकन गुरव, रामचंद्र आर लांडगे, दादासाहेब पोटभरे, प्रसाद शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ४२ वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पटीने आरोपी करुणेश जैन व आकाश जैन यांना त्यांच्या मिळकतीच्या कामासाठी कुलमुखत्यारपत्र दिले. त्याचा गैरवापर करून आरोपींनी फिर्यादी यांच्या पतीच्या नावावर असलेली मिळकत हडप करण्याच्या उद्देशाने बनावट दस्त अस्तित्वात आणून, खोटे अंगठे व सह्या करून खरेदीखत नोंदवले. त्याबाबत फिर्यादीला कोणताही मोबदला न देता तो दिला आहे असे दाखवून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.