दि २० मे (पीसीबी ) – दर पाचवर्षांनी लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका होतात. या निवडणुकांमध्ये नागरिकांना जास्तीत जास्त मोठ्या संख्येने मतदान करण्याच आवाहन करण्यात येतं. राजकीय नेत्यांबरोबर विविध NGO, सेलिब्रिटी मतदान करण्याच आवाहन करतात. मात्र, इतक सर्व केल्यानंतरही शहरी भागात मतदारांमध्ये तितका उत्साह दिसत नाही. उलट ग्रामीण भागात जास्त मतदान झालेल पहायला मिळतं. यंदा मात्र चित्र उलट आहे. मुंबईसह शेजारच्या ठाण्यात मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रांबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्याच चित्र आहे. काही ठिकाणी मतदानाला एक ते दोन तास लागत आहेत. नागरिकांना ताटकळत रांगेत उभ रहाव लागतय. मतदान खरतर काही मिनिटांची प्रक्रिया आहे. मतदारांमध्ये उत्साह असला, तरी मतदान केंद्रावर प्रोसेस संथ गतीने सुरु आहे.
काही मतदान केंद्रांवर मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे नागरिकांना ताटकळाव लागत आहे. उत्तर मध्य मुंबईतल्या अनेक मतदान केंद्रांवर भर दुपारी रांगा लागल्या आहेत. वांद्रे येथील मतदान केंद्रावर दुपारी 1 वाजताही मतदारांची गर्दी आहे. महिला मतदारांचाही मोठा सहभाग आहे. मुंब्र्यात मतदान केंद्रावर मतदारांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागल्या असून मशीन यंत्रणा स्लो झाल्याचं कारण सांगितलं जातं आहे. मुंब्र्यातील अनेक मतदान केंद्रावर हीच स्थिती असल्याचे बोलले जात आहे.
ठाणे मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात दुपारी 1.00 वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 26.05 टक्के मतदान झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण 13 मतदार संघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 27.78 टक्के मतदान झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
ठाणे – २६.०५ टक्के
मुंबई उत्तर – २६.७८ टक्के
मुंबई उत्तर – पश्चिम – २८.४१ टक्के
मुंबई उत्तर – पूर्व – २८.८२ टक्के
मुंबई उत्तर – मध्य – २८.०५ टक्के
मुंबई दक्षिण – मध्य- २७.२१ टक्के
मुंबई दक्षिण – २४.४६ टक्के
धुळे- २८.७३ टक्के
दिंडोरी- ३३.२५ टक्के
नाशिक – २८.५१ टक्के
पालघर- ३१.०६ टक्के
भिवंडी- २७.३४ टक्के
कल्याण – २२.५२ टक्के