ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास पैसे मिळतील, असे आमिष दाखवून एका महिलेची दोन लाख 45 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 12 मार्च 2024 रोजी बावधन येथे घडली.
याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेला व्हाटस अप द्वारे सुरुवातीला संपर्क केला. तिथे त्यांना गुगल रेटिंग टास्क देतो, ते टास्क पूर्ण केल्यास जास्त पैसे मिळतील, असे महिलेला आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर महिलेला टेलिग्रामवर जॉईन करण्यास सांगत तिथे वेगवेगळी कारणे सांगून महिलेकडून दोन लाख 45 हजार रुपये घेत फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.