कट मारल्याने मद्यपीने केली दोन वाहनांची तोडफोड

0
133

कट का मारला असे म्हणत एका मद्यपीने दोन वाहनांची तोडफोड करत एकास मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 12) रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुटकेवाडी चौकात घडली.

गणेश दिलीप राठोड (वय 26, रा. मुटकेवाडी चौक, चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार गणेश वाडेकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश याने मुटकेवाडी चौकात दोन कारच्या काचा फोडून त्यांचे नुकसान केले. तसेच कार चालक अतिश साहेबराव अहंकारे (वय 30, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांना कट का मारला, असे म्हणून हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच अतिश यांना जीवे मारण्याची धमकी दिली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.