गणेश मूर्तिकार नितीन गांधी यांचे निधन

0
112

आळंदी : येथील श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे पुजारी नितीन नरहर गांधी ( वय ६५ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, सून, नातू, एक मुलगी, जावई व नात, तसेच तीन भाऊ, भावजय, पुतणे, पुतणी, नातवंडे व दोन बहिणी असा परिवार आहे.

आळंदी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे माजी सेक्रेटरी सुरेश गांधी, ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे माजी व्यवस्थापक, आळंदी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सुधीर गांधी यांचे धाकटे बंधू आणि आळंदी नगरपरिषद माजी नगरसेविका व श्री ज्ञानेश्वर विद्यालयाच्या संस्कृत विषयाच्या सेवा निवृत्त शिक्षिका श्रीमती. नीता गांधी यांचे ते पती होत. सुप्रसिद्ध गायक व अभिनेता अवधूत सुधीर गांधी यांचे ते काका होते.

श्री ज्ञानेश्वर महाराज व श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांना चंदन उटी करण्यात तसेच श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या वार्षिक उत्सवासह सणावाराला श्रींना निरनिराळ्या अवतारात पोशाख करण्यात त्यांचा हातखंडा होता. तसेच परंपरागत श्री गणेशाच्या सुबक मूर्ती तयार करण्यात ही त्यांचा हातखंडा होता. ते गणेश मूर्ती बनवण्यात आळंदी पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. त्यांनी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची निस्वार्थीपणे अखंड सेवा केली. तसेच त्यांनी आळंदी नगरपरिषद पाणी पुरवठा केंद्र येथे बरीच वर्षे सेवा केली.