भोसरी येथील बालाजीनगर झोपडपट्टी मधून एका घरातून चोरट्याने दोन मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 9) मध्यरात्री साडेबारा वाजता घडली.
अश्विन अशोक सुरवाडे (वय 24, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तम्मा गोटे (वय 25, रा. बालाजीनगर झोपडपट्टी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरवाडे यांच्या घराचा दरवाजा बंद न करता लोटून घेतला होता. मध्यरात्री आरोपीने घरात प्रवेश केला. घरातून 20 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन आरोपीने चोरून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.









































