गाडीला कट मारल्याचा जाब विचारला म्हणून तरुणाच्या पोटात चाकूने भोकसले आहे. ही घटना बावधन येथे मंगळवारी (दि.7) घडली आहे.
याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी सर्वेश दिलीप दिवार (वय 40 रा.कोथरूड) याला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात यश अनिल शिंदे (वय 23 रा.बावधन) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र मोहन भगवान काळे हे दुचाकीवरून जात होते. यावेळी मित्राच्या गाडीला आरोपीने त्याच्या कारने कट मारला. यावेळी फिर्यादी व त्यांच्या मित्रांनी आरोपीला अडवून तू इंडिकेटर न देता गाडी वळवत कट का मारला अशी विचारणा केली. याचा राग येवून आरोपीने मोहन काळे याला चोकू पोटात मारून गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी अडवण्यास गेले असता त्यांनाही चाकू दाखवून धमकावले. यावरून हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाै असून पोलीस पुढील तपास करत आहेत.









































