तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

0
360

दि ८ मे (पीसीबी ) – तडीपार गुंडाला भोसरी पोलिसांनी शस्त्रासह अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 7) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास पवार वस्ती, दापोडी येथे करण्यात आली.

बॉबी उर्फ चार्ल्स शेखर पिल्ले (वय 23, रा. पवार वस्ती, दापोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सागर जाधव यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बॉबी पिल्ले याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो कोणतीही परवानगी न घेता शहरात आला. त्याने स्वतःकडे शस्त्र बाळगले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर भोसरी पोलिसांनी कारवाई करत बॉबी पिल्ले याला अटक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.