खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे जपले पावित्र्य..!

0
118

वढू बू | शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रचारादरम्यान छत्रपती संभाजी महाराजांच्या समधीस्थळाला भेट दिली. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होऊन पुढच्या प्रचाराला मार्गस्थ झाले परंतु समधीस्थळाला भेट देताना राजकीय जोडे बाहेर ठेऊन छत्रपती संभाजी महाराजांना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अभिवादन केले.

शिरुर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार सुरू आहे. या प्रचाराच्या रणधुमाळीतही डॉ. अमोल कोल्हे हे छ्त्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचे पावित्र्य जपायला विसरले नाही. प्रचार दौरा सुरू असताना वढू बू. (ता. शिरुर) येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समधीस्थळाला अभिवादन करण्यासाठी जात असताना डॉ. कोल्हे यांनी आपल्या गळ्यातील प्रचाराचे साहित्य काढून ठेवले आणि मगच समधीस्थळावर जाऊन छत्रपती संभाजी महाराजांचे दर्शन घेतले. सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनाही गळ्यातील आणि इतर प्रचाराचे साहित्य बाहेर काढून ठेवण्यास सांगितले. समाधीस्थळावर नतमस्तक होऊन बाहेर आल्यानंतर पुन्हा प्रचाराचे साहित्य ताब्यात घेऊन मगच डॉ. अमोल कोल्हे पुढे प्रचाराला प्रस्थान केले.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केवळ छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली नाही तर ती भूमिका रुजविण्यासाठी देखील प्रयत्न केले. छत्रपती संभाजी महाराजांचा १५७ देशांमध्ये खरा इतिहास पोहचविण्यासाठी डॉ. कोल्हे यांनी घेतलेली मेहनत सर्वश्रुत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्याप्रति खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची असलेली आस्था आज वढू बू. येथे दिसून आली.