पूर्ववैमनस्यातून महिलेवर कोयत्याने वार

0
123

जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाने एका महिलेवर कोयत्याने वार केले. ही घटना रविवारी (दि. 6) सायंकाळी पाच वाजताच सुमारास झुलेलाल मंदिराजवळ पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी जखमी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नारायण देवासी (वय 28, रा. सोनार गल्ली, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नारायण आणि फिर्यादी महिला यांचे जुने वाद आहेत. त्या वादातून नारायण याने महिलेवर कोयत्याने वार केले. यात महिलेच्या डोक्यात, हातावर गंभीर दुखापत झाली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.