तब्बेत बिगडल्याने शरद पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द

0
123

दि ६ मे (पीसीबी ) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. शरद पवार गेल्या काही दिवसांपासून निवडणूक प्रचारात फिरत आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या जाहीर सभा घेतल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांत या सभांसाठी हजारो किलोमीटरचा प्रवास केला आहे. त्यांनी प्रत्येक सभेत जाहीर भाषणही केले आहे. आपल्या भाषणात शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच शरद पवार यांचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. यानंतर त्यांनी पहिल्या टप्प्यापासूनच लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कामाला सुरुवात केल्याचे दिसून आले.

काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात निलेश लंके यांच्या प्रचारासाठी आल्यानंतर त्यांनी घसा दुखत असल्याचे सांगितले होते. मात्र, तरीही त्यांनी अनेक ठिकाणी निवडणूक सभा घेतल्या. या सर्व बैठका आणि दौऱ्यांच्या ताणामुळे त्यांची प्रकृती ढासळली आहे. साहेबांना विश्रांतीची गरज असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. त्यामुळे त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

साहेबांच्या तब्बेतीच्या कारणास्तव त्यांचं आजचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दगदगीमुळेच शरद पवारांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सध्या डॉक्टरांनी त्यांना विश्रातींचा सल्ला दिला आहे.

निवडणूक जाहीर झाल्यापासून पायाला भिंगरी लावून राज्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचारात सलग भाषण देत असल्याने पवारांचा घसा खराब झाला आहे. त्यामुळे बारामतीतली सांगता सभा आटोपल्यानंतर शरद पवार हे गोविंद बागेत विश्रांती घेत आहेत. दरम्यान डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर साहेबांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.