चिंचवडमध्ये सदनिकेस आग

0
174

दि ५ मे (पीसीबी ) – चिंचवड मधील शाहूनगर परिसरात एका सदनिकेला आग लागली. यामध्ये सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही घटना रविवारी (दि. 5) पहाटे सव्वा पाच वाजताच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, पहाटे सव्वा पाच वाजता पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाला वर्दी मिळाली की, शाहूनगर, चिंचवड येथील एचडीएफसी कॉलनी मध्ये दुसऱ्या मजल्यावरील एका सदनिकेस आग लागली आहे. त्यानुसार मुख्य अग्निशमन केंद्र, चिखली आणि तळवडे उपकेंद्रातील बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाणी मारून एका तासात आग विझवली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र सदनिकेतील साहित्य जळाल्याने अंदाजे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.