वृद्ध शेतकऱ्याची सव्वा चार लाखांची फसवणूक

0
86

दि ५ मे (पीसीबी ) – एका वृद्ध शेतकऱ्याच्या बँक खात्यातून चार लाख रुपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक करण्यात आली. ही घटना 30 एप्रिल 2024 रोजी वाकड येथे घडली.

याप्रकरणी 66 वर्षीय शेतकऱ्याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका मेसेज मध्ये लिंक आली. ती लिंक फिर्यादी यांनी ओपन केली. त्यानंतर त्यांना 8 हजार 790 कॅश हँडलिंग चार्ज परत आला असल्याचा एक मेसेज आला. तिथे फिर्यादी यांनी आधार कार्ड व पॅन कार्ड अपलोड केले. त्यानंतर फिर्यादी यांच्या खात्यातून 25 हजार रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला. पैसे कट होताच दीपक सिंघानिया नाव सांगणाऱ्या व्यक्तीचा फोन आला. फोनवरील व्यक्तीने तो रिझर्व बँक ऑफ इंडिया मधून बोलत असून त्यास 8 हजार 790 रुपये फिर्यादी यांच्या बँक खात्यात जमा करायचे असल्याचे सांगत त्याने फिर्यादीकडे ओटीपी मागितला. फिर्यादी यांनी फोनवरील व्यक्तीला ओटीपी दिला नाही. तरी देखील त्यांच्या बँक खात्यातून चार लाख 23 रुपये डेबिट झाल्याचा मेसेज दिसला. त्यामुळे फिर्यादी यांनी बँक खाते तपासले असता त्यांच्या खात्यातून तीन लाख 99 हजार 823 रुपये ट्रान्सफर झाल्याचे समजले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.