उंडवडी सुपे, बारामती

0
112

महायुतीच्या उमेदवार सौ सुनेत्रावहिनी पवार यांचा उंडवडी सुपे येथील भाजीपाला विक्रेत्यांशी आपुलकीचा संवाद…!

दि ३० एप्रिल (पीसीबी ) – महायुतीच्या उमेदवार सौ सुनेत्रावहिनी पवार आज बारामती तालुक्यात प्रचार दौऱ्यावर असताना उंडवडी सुपे येथे प्रचारासाठी गेल्या होत्या. प्रचार सभा आटोपल्यावर बारामतीकडे निघाल्या असता त्यांनी चक्क भाजीपाला मार्केटमध्ये जाऊन भाजीपाला विक्रेत्यांचे प्रश्न ऐकून घेतले व त्यांच्या अडचणीवर आपण लवकरच मार्ग काढू असा विश्वास त्यांना दिला. तसेच यावेळी सर्व मार्केटमध्ये जाऊन भाजीपाल्याच्या भावाची चौकशी करत एक किलो भेंडी व गवार विकत सुद्धा घेतली. तसेच लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या घड्याळ या चिन्हाला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन विक्रेत्यांना व उपस्थित नागरिकांना केले. यावेळी भाजीपाला खरेदीसाठी काही जेष्ठ नागरिक आले होते. त्यांच्याशीही सुनेत्रा वहिनी यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.