जागेच्या वादातून आई आणि मुलाची दिवसाढवळ्या हत्या

0
199

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) धामधुमीत अमरावती (Amravati Crime News) दुहेरी हत्याकांडाने हादरली आहे. अमरावतीत जागेच्या वादातून आई आणि मुलाची पहारीने हत्या करण्यात आली आहे. तर वडील थोडक्यात बचावले आहे. ही खळबळजनक घटना अमरावती शहरातील मंगलधाम परिसरात येत असलेल्या बालाजी नगरात काल दुपारी घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी पथकासह घटना स्थळाला भेट दिली यावेळी परिसरात शेकडो नागरिकांनी गर्दी केली. आरोपी देवानंद लोणारे आणि पत्नी ज्योति लोणारे यांना पोलीस आयुक्त यांच्या विशेष पोलीस पथकाने ताब्यात घेतले. आई कुंदा देशमुख (65 वर्षे) आणि मुलगा सुरज देशमुख (25 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. वडील थोडक्यात बचावले आहे. वडिल विजय देशमुख गंभीर जखमी आहेत, घटनेची माहिती मिळताच परिसराती नागरिकांनी मोठी गर्दी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगलधाम परिसरातील बालाजीनगरमध्ये देशमुख कुटुंब गेली अनेक वर्षे राहत होते. विजय देशमुख, कुंदा देशमुख, मोठा मुलगा अंकुश आणि लहान मुलगा सुरज असे चार सदस्य राहत होते. लहान मुलगा अंकुश एमआयडीसीमध्ये तर मोठा मुलगा सुरज अमरावतीच्या एका कंपनीत नोकरीला होते. सोमवारी एमआयडीसीला सुट्टी असल्याने संपूर्ण परिवार घरी होता. देशमुख कुटुंबाच्या घरामोर काही महिन्यापूर्वी लोणारे कुटुंबाने घर खरेदी केले होता.

दिवसाढवळ्या हल्ला केल्याने मोठी खळबळ

सोमवारी दुपारी रिकाम्या जागेवरुन देशमुख परिवाराला शिवीगळ करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून कुंदा देशमुख बाहेर आल्या. बाहेर आलेल्या कुंदा देशुमखांना पाहून देवानंद लोणारचा राग अनावर झाला आणि त्याने बेसावध कुंदा देशमुखांच्या डोक्यात पहारीने वार केला. आईच्य किंचळण्याचा आवाज ऐकून सुरज बाहेर आला तर त्याच्या डोक्यात देखील वार करण्यात आला. मुलगा आणि पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून विजय देशमुख वाचवण्यासाठी आले तर त्यांच्यावर देखील वार केला. गोंधळानंतर आजबाजूच्या लोकांनी गर्दी केली होती. बघ्यांची गर्दी पाहताच लोणार आक्रमक झाला आणि त्याने पुन्हा मुलावर आणि आईवर वार केले.

आरोपी दुचाकीवर फरार

वार केल्यानंतर लोणार काहीच न झाल्याचा अविर्भावात घरी गेला. घरी जाऊन पत्नी आणि मुलाला दुचाकीवर घेऊन फरार झाला. सर्व घटना सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी ताबडतोब गुन्हा दाखल करत लोणारचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले. अद्याप लोणारे खून का केला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. फ्रेजरपुरा पोलीस घटनेचा तपास करत आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने अमरावती चांगलेच हादरले आहे.