दि २९ एप्रिल (पीसीबी ) – बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुनेत्रा पवार यांचा जोरदार प्रचार करत आहेत. आपल्या प्रत्येक भाषणात ते महायुतीसोबत का गेले? हे मतदारांना पटवून सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना टार्गेट करत आहेत. पवारसाहेबांनी वेळोवेळी भूमिका बदलत राजकारण केले. साहेबांची भूमिका बदलली की स्टॅट्रजी आणि आम्ही भूमिका घेतली की गद्दारी? वारे वा हे कसे चालले, अशा शब्दांत अजित पवारांनी बारामतीमधील सांगवी येथे झालेल्या सभेत महायुतीत जाण्याच्या निर्णयाचे समर्थन केले.
साहेबांचे वय झाले आहे, असे म्हणत टीका करणाऱ्या अजित पवारांनी थेट आपल्या वयाचा आकडा सांगत आम्ही कधी संधी मिळणार अशी विचारणा केली, अजित पवार म्हणाले, ‘पवारसाहेबांनाही सुरुवातीला कै. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आदी नेते मंडळींबरोबर बारामतीकरांनी संधी दिली आणि तेही घडले. पवार साहेबांप्रमाणेच मीही महाराष्ट्राच्या राजकारणात, प्रशासनात कर्तृत्व दाखवले आणि उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहाेचलो. शेवटी माझेही वय ६२ च्या पुढे गेले आहे. मी किती दिवस थांबायचे, याचाही विचार झाला पाहिजे.’
साहेबांनी वेळोवेळी भूमिका बदलत राजकारण केले. ते चार वेळा मुख्यमंत्री झाले. केंद्रात महत्त्वाची मंत्रिपदे भूषवले. पुलोदचा प्रयोग असो, सोनिया गांधींचा विदेशी मुद्दा असो असे अनेक निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या बदलत्या भूमिकेला आमचाही पाठिंबा होता. मात्र आम्ही भूमिका घेतली तर गद्दार? हे कसे चालेल, असे अजित पवार म्हणाले.
बारामतीकरांनी सुप्रिया सुळे यांना तीन वेळा संधी दिली. आता सुनेत्रा पवारांना संधी द्या. निश्चित विकासाची घाेडदौड मोदीसाहेबांच्या सहकार्याने अधिक गतीने पुढे घेऊन जाऊ, असे आश्वासन अजित पवार म्हणाले. मनमोहन सिंगाच्या काळात देशात 70 हजार कोटींची कर्जमाफी झाली हे विरोधक सातत्याने सांगतात, परंतु एकट्या महाराष्ट्रात भाजपचे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आम्ही लोकांनी ३५ हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांना कर्जमाफी केली हे सांगताना विरोधक सोयीस्करपणे विसरतात, असे अजित पवार म्हणतात.बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुनेत्रा पवार यांचा जोरदार प्रचार करत आहेत. आपल्या प्रत्येक भाषणात ते महायुतीसोबत का गेले? हे मतदारांना पटवून सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना टार्गेट करत आहेत. पवारसाहेबांनी वेळोवेळी भूमिका बदलत राजकारण केले. साहेबांची भूमिका बदलली की स्टॅट्रजी आणि आम्ही भूमिका घेतली की गद्दारी? वारे वा हे कसे चालले, अशा शब्दांत अजित पवारांनी बारामतीमधील सांगवी येथे झालेल्या सभेत महायुतीत जाण्याच्या निर्णयाचे समर्थन केले.
साहेबांचे वय झाले आहे, असे म्हणत टीका करणाऱ्या अजित पवारांनी थेट आपल्या वयाचा आकडा सांगत आम्ही कधी संधी मिळणार अशी विचारणा केली, अजित पवार म्हणाले, ‘पवारसाहेबांनाही सुरुवातीला कै. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आदी नेते मंडळींबरोबर बारामतीकरांनी संधी दिली आणि तेही घडले. पवार साहेबांप्रमाणेच मीही महाराष्ट्राच्या राजकारणात, प्रशासनात कर्तृत्व दाखवले आणि उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहाेचलो. शेवटी माझेही वय ६२ च्या पुढे गेले आहे. मी किती दिवस थांबायचे, याचाही विचार झाला पाहिजे.’
साहेबांनी वेळोवेळी भूमिका बदलत राजकारण केले. ते चार वेळा मुख्यमंत्री झाले. केंद्रात महत्त्वाची मंत्रिपदे भूषवले. पुलोदचा प्रयोग असो, सोनिया गांधींचा विदेशी मुद्दा असो असे अनेक निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या बदलत्या भूमिकेला आमचाही पाठिंबा होता. मात्र आम्ही भूमिका घेतली तर गद्दार? हे कसे चालेल, असे अजित पवार म्हणाले.
बारामतीकरांनी सुप्रिया सुळे यांना तीन वेळा संधी दिली. आता सुनेत्रा पवारांना संधी द्या. निश्चित विकासाची घाेडदौड मोदीसाहेबांच्या सहकार्याने अधिक गतीने पुढे घेऊन जाऊ, असे आश्वासन अजित पवार म्हणाले. मनमोहन सिंगाच्या काळात देशात 70 हजार कोटींची कर्जमाफी झाली हे विरोधक सातत्याने सांगतात, परंतु एकट्या महाराष्ट्रात भाजपचे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आम्ही लोकांनी ३५ हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांना कर्जमाफी केली हे सांगताना विरोधक सोयीस्करपणे विसरतात, असे अजित पवार म्हणतात.