दि २८ एप्रिल (पीसीबी ) – निष्काळजीपणे, भरधाव दुचाकी चालवल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वरील एका तरुणाचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालक जखमी झाला आहे. ही घटना 13 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मुंबई बेंगलोर महामार्गावर देहूरोड येथे घडली.सूर्य प्रताप (वय 20) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ललित कुमार (वय 19, रा. देहूरोड) यांनी शनिवारी (दि. 27) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार असीम (पूर्ण नाव माहिती नाही, वय 24, रा. मामुर्डी देहूरोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असीम आणि फिर्यादी यांचा मित्र सूर्य प्रताप हे दुचाकीवरून सेंट्रल चौक देहूरोड येथून मुकाई चौकाकडे जात होते. ते देहूरोड येथील ईदगाह मज्जिद समोर आले असता असीम याने निष्काळजीपणे भरधाव दुचाकी चालवली. त्यामुळे दुचाकीचा अपघात झाला. त्यात सूर्यप्रतात याचा मृत्यू झाला तर असीम जखमी झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.