दि २८ एप्रिल (पीसीबी ) – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एका व्यक्तीला पाठीमागून आलेल्या दुचाकीने धडक दिली. यामध्ये पादचारी व्यक्ती गंभीर जखमी झाला. ही घटना 16 एप्रिल रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास देहूगाव येथे घडली.
प्रवीण गजानन वसे (वय 36, रा. देहुगाव) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 27) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक शेळके (वय 38, रा. देहूगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वसे हे भैरवनाथ चौक ते गाथा मंदिर असे पायी चालत जात होते. ते अभंग मंगल कार्यालयासमोर आले असता पाठीमागून आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. यामध्ये वसे हे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर दुचाकी चालक घटनास्थळी न थांबता, तसेच घटनेची माहिती न देता, वसे यांना मदत न करता पळून गेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.