पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

0
176

दि २६ एप्रिल (पीसीबी ) – पिस्तूल बाळगल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. २५) रात्री कडाचीवाडी येथे करण्यात आली.

भरत तुकाराम जैद (वय ३०, रा. चिंबळी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार हनुमंत कांबळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण-शिक्रापूर रोडवर कडाचीवाडी येथे एकजण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून भरत जैद याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा ५० हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.