दि २६ एप्रिल (पीसीबी ) – सराफ दुकानात काम करणाऱ्या कामगाराने सात लाख ७७ हजार ७२१ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना २० नोव्हेंबर २०२३ ते २३ एप्रिल २०२४ या कालावधीत चाकण मधील अंबिका ज्वेलर्स या दुकानात घडली.सुनील बबनराव अडाणी (रा. चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी सुशील रामनिवास सोनी (वय ३९, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील हा फिर्यादी सोनी यांच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करत होता. त्याने दुकानातील सात लाख ७७ हजार ७२१ रुपये किमतीचे ९२.५७० ग्रॅम वजनाचे दागिने चोरून नेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.