सदनिकेत सुरु होता वेश्या व्यवसाय; पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई करत केली तीन महिलांची सुटका

0
516

दि २६ एप्रिल (पीसीबी ) – सुस नांदेरोड, बावधन येथे एका सदनिकेत सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी तीन महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. ही कारवाई बुधवारी (दि. २४) रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

सूर्यकांत पंडित देवरे (वय 49, रा. सुस नांदेरोड, बावधन पुणे. मूळ रा. खर्डी रेल्वे स्टेशन, ता. शहापूर, जि. ठाणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार गणेश कारोटे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवरे याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सदनिकेत तीन मुलींना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी भाग पाडले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने बुधवारी सदनिकेत छापा मारला. यामध्ये तीन महिलांची पोलिसांनी सुटका करून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दलालास अटक करण्यात आली. या कारवाई मध्ये २८ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलिस अंमलदार सुनील शिरसाट, मारुती करचुंडे, भगवंता मुठे, गणेश कारोटे, सुधा टोके, वैष्णवी गावडे, रेश्मा झावरे, सोनाली माने यांनी केली आहे.