शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यात सांगत 37 लाखांची फसवणूक

0
136

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत 37 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 15 डिसेंबर ते 4 फेब्रुवारी या कालावधीत रुपीनगर तळवडे येथे घडली.

ब्लॅक स्टोन ग्रुपवरील अहना ठाकूर, मुकेश मेहता, ब्लॅक रॉक ग्रुपवरील मिलीसा, रामजी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुशांत सुरेश वितोंडे (वय 42, रा. साने चौक, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वितोंडे यांनी शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवले होते. त्यावर आरोपींनी सुरुवातीला नफा दिला. त्यानंतर त्यांना आणखी रक्कम गुंतवण्यास सांगितली. वितोंडे यांनी एकूण 37 लाख रुपये गुंतवणूक केली असता आरोपींनी वितोंडे यांना प्रतिसाद देणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.