तळेगाव मध्ये पूर्ववैमनस्यातून गोळीबार

0
142

जुन्या भांडणाच्या कारणावरून तळेगाव मध्ये एकावर गोळीबार झाला. यामध्ये एकजण जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 23) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली.

ध्रुव खीलारी (रा. मंत्रा सिटी, तळेगाव दाभाडे) असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आदित्य भेगडे (रा. तळेगाव दाभाडे) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ध्रुव खीलारी आणि आदित्य भेगडे हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यात पूर्वीपासून वाद आहेत. मंगळवारी रात्री साडअकराच्या सुमारास भेगडे आळी तळेगाव दाभाडे येथे ते एकमेकांच्या समोरासमोर आले. एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि ध्रुव याने आदित्यवर गोळीबार केला. यामध्ये आदित्य किरकोळ जखमी झाला आहे. त्यानंतर आरोपी ध्रुव हा पळून गेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.