नितीन गडकरी यांना सभेत भोवळ

0
199

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यवतमाळच्या पुसद येथील सभेत भोवळ आल्याची माहिती समोर आली आहे. गडकरी भाषण करत असताना अचानक त्यांना भोवळ आली. तेवढ्यात स्टेजवरील लोकांनी आणि अंगरक्षकांनी नितीन गडकरी यांना सावरले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. यवतमाळच्या पुसद येथील जाहीर सभेदरम्यान ही घटना घडली आहे.

यवतमाळमध्ये महायुतीच्या जाहीर सभेत भाषण सुरु असताना नितीन गडकरी यांना भोवळ आली. यावेळी उपस्थितांनी त्यांना सावरलं. आज राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी पुसदच्या शिवाजी ग्राऊंडवर महायुतीकडून जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत भाषणाला उभे राहिलेल्या गडकरींना भोवळ आली.