लोखंडी रॉडने झालेल्या मारहाणीत एकजण गंभीर जखमी

0
283

दि २२ एप्रिल (पीसीबी ) – लोखंडी रॉडने झालेल्या मारहाणीत एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 21) सायंकाळी साडेचार वाजता मावळ तालुक्यातील उर्से येथे घडली.

गोपीनाथ बाळासाहेब लिमण (वय 48, रा. सांगवडे, ता. मावळ) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अनिकेत गोपीनाथ लिमण (वय 20) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 31 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील गोपीनाथ हे उर्से येथे खोल्यांची देखभाल करत असताना त्यांनी एका महिलेचा दरवाजा वाजवल्याच्या कारणावरून त्यांचा वाद झाला. त्या कारणावरून आरोपी महिलेने गोपीनाथ यांना लोखंडी रॉडने डोक्यात, हातावर मारून त्यांना गंभीर जखमी केले. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.