भाजपचे खाते उघडले सुद्धा, पहिला निकाल बिनविरोध

0
200

लोकसभा निवडणुकीमुळे सध्या देशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सगळेच पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. तर सत्ताधारी भाजप आम्ही या निवडणुकीत 400 पेक्षा अधिक जागा जिंकू असा विश्वास व्यक्त करत आहे. दरम्यान संपूर्ण निकालाला अद्याप वेळ असला तरी भाजपला एका जागेवर विजय मिळाला आहे. म्हणजेच भाजपने विजयाचं खातं खोललं आहे.

गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार
काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांच्या फॉर्मवर भाजपकडून आक्षेप नोंदवण्यात आला होता आणि त्यासंदर्भात काल म्हणजेच रविवारी सुनावणी होऊन काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज अवैध आणि रद्द ठरवण्यात आला.

या जागेवर एकूण 10 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते, त्यानंतर काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द झाला असून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांच्या विरोधात एकूण आठ उमेदवार होते. आता त्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजप उमेदवाराचा विजय निश्चित आहे.

सुरत मतदारसंघातून अपक्ष आणि इतर पक्षांच्या उमेदवारांनी आधीच आपली नावे मागे घेतली होती. यानंतर भाजपचे मुकेश दलाल आणि बसपचे प्यारेलाल हे दोनच उमेदवार राहिले. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान बसपचे उमेदवार प्यारेलाल यांनी आपला फॉर्म मागे घेतला, तर भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना या जागेवर बिनविरोध विजयी घोषित करण्यात आलं आहे. त्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे.

दलाल यांच्या विजयाची सुरतच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घोषणा केली आहे. विशेष म्हणजे त्यांना खासदारकीचे पत्रही देण्यात आले आहे. अन्य सर्व उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता दलाल प्रत्यक्ष निवडणूक न लढवताच खासदार झाले आहेत.