बाथरूम मधील ऍसिड पिऊन विवाहितेची आत्महत्या

0
371

पती आणि दिराने विवाहीतेकडे पाच लाख रुपये हुंडा आणि चारचाकी गाडी माहेरहून आणण्याची मागणी करत तिचा छळ केला. पती आणि दिराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने बाथरूम मधील ऍसिड पिऊन आपले जीवन संपवले. हा प्रकार 15 डिसेंबर 2023 ते 8 एप्रिल 2024 या कालावधीत श्रीनगर रहाटणी येथे घडला.

पती राहुल मुन्ना पटेल (वय 27), दीर रोहित कुमार मुन्ना पटेल (वय 25, दोघे रा. श्रीनगर, रहाटणी. मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विवाहितेच्या 26 वर्षीय भावाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या बहिणीकडे पाच लाख रुअप्ये हुंड्याचे पैसे आणि चारचाकी गाडी घेण्यासाठी आठ ते दहा लाख रुपये माहेरहून आणण्याची मागणी केली. तसेच विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली. पती राहुल आणि दीर रोहित यांच्या त्रासाला कंटाळून 8 एप्रिल रोजी विवाहितेने बाथरूम मधील ऍसिड पिऊन आत्महत्या केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.