पराभव समोर दिसू लागल्याने महायुतीकडून वैयक्तिक टीका – डॉ. अमोल कोल्हे

0
199

पुणे : धोरणात्मक मुद्दे नसल्याने महायुतीच्या नेत्यांकडून वैयक्तीक टीका केली जात असल्याच वक्तव्य महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं.

महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट आघडी लोकसभा निवडणूक 2014 च्या अधिकृत उमेदवारांची प्रचार शुभारंभ सभा आज पुण्यात पार पडली. या सभेपुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर शांताई हॉटेल समोर महाविकास आघाडीतील तिन्ही उमेदवारांसाठी प्रचारची शुभारंभ सभा घेण्यात आली.

जेष्ठ नेते मा. शरदरचंद्रजी पवार, काँग्रेसचे नेते मा. पृथ्वीराज चव्हाण, मा. बाळासाहेब थोरात, मा. मोहन जोशी, या सभेला बारामती आणि पुणे लोकसभेचे उमेदवार सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर, विश्वजित कदम, मा. संग्राम थोपटे, मा. संजय जगताप, शिवसेनेचे मा. सुषमा अंधारे, मा. सचिन आहेर,  आपचे नेते अजित पाटील, मा.भूषणसिंहराजे गजेंद्रसिंहराजे होळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. अमोल कोल्हे पुढे म्हणाले, प्रचाराची दुसरी आणि तिसरी फेरी सुरू असताना देशातील आणि राज्यातील जनतेचे ठरले की, स्वाभिमानाने तुतारी फुक्याची आणि मशाल पेटवायची. पण मला धोरणात्मक मुद्दे नसल्याने महायुतीच्या नेत्यांकडून वैयक्तीक टीका केली जात आहे.

मला नटसम्राट म्हणले जाते, कार्य सम्राट परवडतो पण खोके सम्राट ,पलटी सम्राट चालत नाही. कचाकचा बटन दाबा तुम्हाला हवा तेवढा निधी देतोझ या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचाही डॉ. कोल्हे यांनी चांगलाच समाचार घेतला. लोकशाहीची थट्टा करता का सवाल करत , तुम्ही जो निधी देणार म्हणून सांगता तो तुमचा नाही तर जनतेचा पैसा आहे. स्वतःची मालकी असल्या सारखे वागत असाल तर हा कर त्याच दोन टक्के लोकांकडून घेत जावा. सत्तेची मस्ती, गुर्मी कोठून येते असा थेट सवाल ही डॉ. कोल्हे यांनी केलाय.