नारायणगाव – आपल्या विरोधात बोलतील त्यांना इंजेक्शन द्या असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी चांगलाच समाचार घेतलाय.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच हे विधान म्हणजे पीएचडी करून काय दिवे लावणार,अशा पध्दतीने विधानभवनात जी हेटाळणी केली होती त्या पध्दतीचे आहे. हे विधान काही काळासाठी गृहित धरलं तर देशात इंजेक्शनचा तुटवडा पडेल. कारण सर्वसामान्य माणसाने ठरवलंय अबकी बार भाजप हद्दपार. आता भाजप हद्दपार म्हटल्यावर त्यांच्या मांडीवर जे कोणी बसलेत त्यांची काय परिस्थिती होईल हे सर्वे मध्ये समोर आलं आहे …त्याचबरोबर हे विधान ऐकल्यावर हे ही पुन्हा अधोरेखित होत की, लोकप्रतिनिधी हा सुशिक्षित आणि सुसंस्कृत असावा, असा टोला ही डॉ. कोल्हे यांनी लगावला.