ऑनलाईन टास्क च्या बहाण्याने महिलेची तीन लाखाची फसवणूक

0
253

महिलेला पार्ट टाईम जॉब सांगून ऑनलाईन टास्क देत तीन लाख रुपयांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक 26 मार्च 2024 रोजी मारुंजी येथे घडली आहे,

याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.16) महिलेने फिर्याद दिली आहे, यावरून व्हॉटसअप ग्रुपवरील अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना पार्ट टाईम जॉब चे आमिष दाखवून ऑनलाईन टास्क देत 12 टास्क पूर्ण करवून घेतले. यात फिर्यादीकडून वेळोवेळी एकूण 2 लाख 92 हजार रुपये घेतले व ते परत न करत फिर्यादीची फसवणूक केली आहे, यावरून हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.