शाहू महाराजांची संपत्ती ३०० कोटींची

0
159

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये यंदा राजघरण्यातील शाहू महाराज छत्रपती निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदाच आपल्या जवळील संपत्तीचे विवरण निवडणूक अर्जामध्ये जाहीर केले आहे. त्यानुसार कोल्हापूरच्या गादीचे वारसदार असलेल्या श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे सुमारे ३०० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी आपल्या विवरण पत्रात नमूद केले आहे. तर त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे छत्रपती यांच्या नावे ४१ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

शाहू छत्रपती यांच्याकडे असलेल्या मालमत्तेचा तपशील असा

147 कोटी 64 लाख 49 हजार रुपयांची जंगम मालमत्ता
149 कोटी 73 लाख 59 हजारांची स्थावर मालमत्ता
1 कोटी 56 लाखांचे सोन्याचे, तर 55 लाखांचे चांदीचे दागिने
6 कोटींची वाहने नावावर आहेत
122 कोटी 88 लाख किंमतीची शेतजमीन

शाहू महाराजांच्या पत्नी याज्ञसेनीराजे यांच्या नावे
17 कोटी 35 लाख जंगम मालमत्ता
23 कोटी 71 लाखांची स्थावर मालमत्ता
7 कोटी 52 लाख रुपयांची शेतजमीन

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या विरोधात संजय मंडलिक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विद्यमान खासदार असलेले संजय मंडलिक यांनी शाहू महाराज यांना तगडे आव्हान देण्याची तयारी केली आहे. शाहू महाराज हे खरे वारसदार नसल्याचे संजय मंडलिक यांनी म्हटले आहे. त्यांना दत्तक घेण्यात आले असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते. यावरून सध्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये चांगलेच वादंग उठले आहे.